INDvsAUS| नागपूर टेस्ट ‘या’ खेळाडूचा शेवटचा सामना?

| Updated on: Feb 10, 2023 | 6:17 PM

टीम इंडियाचा स्टार फलंदाजाला सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. नागपूरमधी पहिल्या कसोटीत या बॅट्समनला सुरुपात चांगली मिळाली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही.

INDvsAUS| नागपूर टेस्ट या खेळाडूचा शेवटचा सामना?
Follow us on

नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूरमध्ये बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांमध्ये गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने शानदार शतक ठोकलं, ज्यामुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत पोहचली. या दरम्यान टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा अपयशी ठरला. या फलंदाजाने 71 बॉलचा सामना करत 20 धावाच केल्या.

केएल राहुल याचं भविष्य धोक्यात?

आपण बोलतोय ते टीम इंडियाचा सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल याच्याबाबत. केएलच्या कसोटी करिअरवर टांगती तलवार आहे. केएलने चांगली कामगिरी न केल्यास त्याला टीममधून बाहेर केलं जाऊ शकतं, असं आम्ही नाही तर बीसीसीआय अधिकाऱ्यांचं मत आहे. उपकर्णधार आहे म्हणून टीममधून बाहेर करता येत नाही, असा कोणता नियम नाही, असं या अधिकाऱ्याने नमूद केलं.

बीसीसीआय अधिकाऱ्याचं विधान

केएल देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व करतो. मात्र आता केएल अपयशी ठरतोय. केएलला धावा करण्यात संघर्ष करायला लागतोय. केएल उपकर्णधार असल्याने त्याला अजून टीममध्ये ठेवण्यात आल्याची चर्चाही सुरु आहे. आता याबाबत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने विधान केलंय.

हे सुद्धा वाचा

केएलला कोणतीही विशेष वागणूक दिली जात नाहीये. जर तो चांगला नाही खेळला नाही, तर त्यालाही टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला माहिती दिली. त्यानुसार, “सध्या उपकर्णधार म्हणून कोणतीही सवलत नाही. कोण म्हटलं उपकर्णधार आहे म्हणून सोडून दिलं जातंय. असा कोणताही नियम नाही, की ज्यानुसार उपकर्णधाराला संघातून हटवता येत नाही. केएल भविष्यातील कसोटी संघाचा कर्णधारपदाचा दावेदार आहे. पण जेव्हा प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर धमाकेदार कामगिरी करणारा खेळाडू असतो, तेव्हा कोणतीही जोखमी घेता येत नाही”, असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

दरम्यान टीम इंडिया नागपूर कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर 144 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 321 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक 120 धावा केल्या. तर खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल दोघेही अनुक्रमे 66 आणि 52 धावांवर नाबाद होते.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.