भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी पहिला दिवस संपला. भारतीय गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने पहिला दिवस गाजवला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजांची घसरगुंडी सुरु झाली. एका पाठोपाठ एक धडाधड विकेट पडू लागले. भारताकडून नितीश रेड्डीने 41, ऋषभ पंतने 37 आणि केएल राहुलने 26 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर सोपं आव्हान आहे असं वाटत होतं. पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत कमबॅक केलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमवून 67 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या हातात 3 गडी असून 83 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, मोहम्मद सिराजने 2 आणि हार्षित राणाने एक विकेट घेतली. यात हार्षित राणाने ट्रेव्हिस हेडची विकेट काढली. काही कळायच्या आतच चेंडू त्रिफळा घेऊन गेला.
भारतीय संघाला मागच्या एका वर्षात सर्वाधिक त्रास हा ट्रेव्हिस हेडने दिला आहे. ट्रेव्हिस हेडने एकदा नाही तर दोनदा भारताचं जेतेपदाच्या स्वप्नावर पाणी फेरलं आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये त्याने भारताच्या जेतेपदाचा रस्ता अडवला होता. त्यामुळे त्याची विकेट भारतासाठी खूपच महत्त्वाची होती. हार्षित राणाने हा टास्क पूर्ण केला. पदार्पणाच्या सामन्यातच हार्षितने हेडची डोकेदुखी दूर केली. असा चेंडू टाकला की हेडला कळलाच नाही आणि त्रिफळा घेऊन गेला.
What a way to get your maiden Test wicket! ⚡️#DeliveredwithSpeed | #AUSvIND | @NBN_Australia pic.twitter.com/IkykgwUEWW
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2024
बाद झाल्यानंतर हार्षित राणा आणि ट्रेव्हिस हेड यांनी एकमेकांच्या नजरेला नजर दिली. कारण हेडने त्याच्या आधीच्या षटकात दोन चौकार मारले होते. पण हार्षित राणाने पुढच्या षटकात वचपा काढला. हेडला फक्त 11 धावा करता आल्या. हार्षित राणाची आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दितील ही पहिलीच विकेट आहे. भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या दिवशी तीन गडी झटपट बाद करण्याचं आव्हान आहे. खेळपट्टी पाहता भारताने दुसऱ्या डावात 200 ते 250 धावा केल्या तरी विजय मिळवू शकतात.