ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी टीम इंडियाने साजेशी कामगिरी केली आहे. पहिल्या डावात भारताचा डाव 150 धावांवर आटोपला होता. त्यामुळे पहिल्या कसोटीत पराभव होईल असाच अंदाच क्रीडाप्रेमींनी बांधला होता. पण भारतीय गोलंदाजांनी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. ऑस्ट्रेलियाला 104 धावांवर रोखलं आणि 46 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून होतं. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने सावध फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. यशस्वी जयस्वालने 123 चेंडूंचा सामना अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने कसोटीतील 9वं अर्धशतक ठोकलं आहे. यशस्वी जयस्वाल न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फेल गेला होता. त्यामुळे त्याची संघातील जागा डळमळीत झाली होती. पण अखेर त्याला सूर गवसला आणि यशस्वी जयस्वालने आता शतकाच्या दिशेने कूच गेली आहे.दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला डिवचत होता. सामन्यादरम्यान स्टार्क त्याला बाउंसरवर बाउंसर टाकत होता. तेव्हा यशस्वी जयस्वाल म्हणाला की, ‘चेंडू खूपच स्लो येत आहे.’ त्याचं असं म्हणणं ऐकून स्टार्कलाही हसू आवरलं नाही.
यशस्वी जयस्वालने या खेळीने पहिल्या डावातील कसर भरून काढली. यशस्वी जयस्वाल पहिल्या डावात फेल गेला होता. त्याला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. 8 चेंडूंचा सामना केल्यानंतर मिचेल स्टार्कने त्याला तंबूचा रस्ता दाखवला होता. दरम्यान, दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने आपली चूक दुरूस्त केली. केएल राहुलसोबत साजेशी कामगिरी केली. दोघांनी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली.
JAISWAL TO STARC:
“It’s coming too slow” 😄🔥 pic.twitter.com/MXziersdUP
— Johns. (@CricCrazyJohns) November 23, 2024
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज