IND vs AUS 2nd Odi | ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीम इंडियात मोठा बदल

| Updated on: Sep 24, 2023 | 2:03 PM

india vs australia 2nd odi toss | ऑस्ट्रेलियासाठी दुसरा सामना हा आरपारचा आहे. ऑस्ट्रेलियाला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी हा दुसरा सामना जिंकावा लागणार आहे.

IND vs AUS 2nd Odi | ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीम इंडियात मोठा बदल
Follow us on

इंदूर | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने या दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने कॅप्टन बदलला आहे. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी किती धावांचं आव्हान देतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडियात मोठा बदल

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याच्या जागी प्रसिध कृष्णा याला संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह हा कौटुंबिक कारणामुळे दुसऱ्या सामन्यात सहभागी होऊ शकत नसल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. तसेच बुमराह राजकोट इथे होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात सहभागी होईल, असंही बीसीसीआयने म्हटलंय.

टीम इंडियाचे अंतिम 11 शिलेदार

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हनमध्येही बदल

ऑस्ट्रेलियानेही या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. कॅप्टन पॅट कमिन्स याने पहिल्या सामन्यातून दुखापतीनंतर कमबॅक केलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात पॅटला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी स्टीव्हन स्मिथ याला दुसऱ्या सामन्यात कर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्पेन्सर जॉनसन याने एकदिवसीय पदार्पण केलं आहे.

टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी

दरम्यान टीम इंडियाने मोहालातील पहिला सामना 5 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका खिशात घालण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.