इंदूर | टीम इंडियाने शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने विजयी सलामी दिली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत दमदार कामगिरी करण्याचा मानस आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया सज्ज आहेत. हा दुसरा सामना कधी आणि कुठे होणार, कुठे पाहता येणार हे सर्व आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय रविवारी 24 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर दुपारी 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहता येईल. तर फ्रीमध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल. जिओ सिनेमा एपवर एकूण 12 भाषांमध्ये सामन्याची कॉमेंट्री ऐकता येणार आहे.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर),
नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.