इंदूर | टीम इंडियाने रविवारी 24 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 99 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला पावसामुळे 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 28.2 ओव्हरमध्ये 217 धावांवर ऑलआउट केलं. टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये शानदार कामगिरी केली. 20 महिन्यांनी वनडे कमबॅक केलेल्या आर अश्विन याने या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. आर अश्विन याने 7 ओव्हरमध्ये 41 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.
आर अश्विन याने डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन आणि जोस इंग्लिस या तिघांची विकेट घेतली. आर अश्विन याने या 3 विकेट्सह महारेकॉर्ड केला आहे. आर अश्विन एका टीम विरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत एकूण 144 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने यासह माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि कपिल देव यांना मागे टाकलं आहे.
अनिल कुंबळे याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 142 विकेट्स घेतल्या. तर माजी दिग्गज ऑलराउंडर कपिल देव यांच्या नावावर 141 विकेट्सची नोंद आहे. देव यांनी पाकिस्तान विरुद्ध 141 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध 135 विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियाचे एका टीम विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
Whatta achievement by R Ashwin anna 🔥 #INDvsAUS pic.twitter.com/jkhZevRiaE
— Indian Elon (@elonifiedmusk) September 24, 2023
आर अश्विन – 144 विकेट्स (ऑस्ट्रेलिया)
अनिल कुंबळे – 142 विकेट्स (ऑस्ट्रेलिया)
कपिल देव – 141 विकेट्स (पाकिस्तान)
अनिल कुंबळे – 135 विकेट्स (पाकिस्तान)
कपिल देव – 132 विकेट्स (विंडिज)
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.