इंदूर | टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडून काढलं. कॅमरुन ग्रीन तर सूर्याला कधीच विसरणार नाही. सूर्यकुमार यादव याने ग्रीनच्या बॉलिंगवर एकाच ओव्हरमध्ये सलग 4 सिक्स ठोकले. सूर्याला 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारण्याचा कारनामा करण्याची संधी होती. मात्र ते काही होऊ शकलं नाही. मात्र सूर्याने या 4 सिक्सच्या मदतीने अवघ्या 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने यासह रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सूर्याने याबाबतीत टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला आहे.
सूर्याने टीम इंडियाच्या डावातील 44 व्या ओव्हरमध्ये 4 सिक्स ठोकले. सूर्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 37 बॉलमध्ये नॉट आऊट 72 धावा केल्या. सूर्या टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. सूर्याने यासह विराटला मागे टाकलं. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 27 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. तर सूर्याने 24 बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली.
सूर्यकुमार यादव टीम इंडियाकडून वेगवान अर्धशतक झळकावणारा एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. टीम इंडियाकडून वेगवान अर्धशतकांचा विक्रम हा माजी वेगवान गोलंदाज आणि विद्यमान निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर याच्या नावावर आहे. आगरकर याने 2000 साली झिंबाब्वे विरुद्ध 21 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. तर त्यानंतर टीम इंडियाकडून कपिल देव, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह आणि राहुल द्रविड यांच्या नावावर 22 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम आहे.
दरम्यान सूर्युकमार यादव याने आतापर्यंत एकूण 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सूर्याने या सामन्यात 4 अर्धशतकांच्या मदतीने 659 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.