विशाखापट्टणम | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. टीम इंडिया अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे बॅट्मसन अपयशी ठरली. सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या चोघांना भोपळाही फोडता आला नाही. अक्षर पटेल याने शेवटपर्यंत नाबाद राहत 29 धावा जोडल्या. ज्यामुळे टीम इंडियाला 100 धावांचा टप्पा पूर्ण करता आला. रविंद्र जडेजा 16 धावा करुन बाद झाला. तर कॅप्टन रोहित शर्मा याने 13 धावा केल्या. या व्यतिरक्त केएल राहुल याने 9, हार्दिक पंड्या 1 आणि कुलदीप यादव याने 4 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क व्यतिरिक्त सिन एबोट याने 3 विकेट्स घेतल्या. नॅथन एलिस याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
दरम्यान स्टार्क याने या सामन्यात 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाला पाणी पाजलं. स्टार्क याने 8 ओव्हरमध्ये 53 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने 1 मेडन ओव्हर टाकली. स्टार्कने कॅप्टन रोहित शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज या 5 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
या दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात एकूण 2 बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन रोहित शर्मा याच्या कमबॅकमुळे इशान किशन याला बाहेर बसावं लागलं आहे. तर शार्दुल ठाकूर याच्या जागी अक्षर पटेल याला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस स्टोयनिस, नाथन एलिस, सेन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.