IND Vs AUS, 2nd ODI, Live Streaming | जाणून घ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबाबत सर्वकाही?

| Updated on: Mar 18, 2023 | 4:10 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा 19 मार्च रोजी विशाखापट्टणम इथे खेळवण्यात येणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.

IND Vs AUS, 2nd ODI, Live Streaming | जाणून घ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबाबत सर्वकाही?
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 अशा फरकाने मालिका विजय मिळवला. यानंतर आता टीम इंडियाला वनडे सीरिज जिंकण्याची संधी आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला शुक्रवार 17 मार्चपासून सुरुवात झाली. भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या सामन्यात कांगारुंवर 5 विकेट्सने मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना टीम इंडियााने जिंकला तर मालिकाही जिंकेल. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचं हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे.

पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजा याने 2 तर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. यामुळे ऑस्ट्रेलिया 188 धावांवर ऑलआऊट झाली.

या विजयी धावांचं पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या दोघांनी 108 धावांची नाबाद भागीदारी करत टीम इंडियाला विजयी केलं. या भागीदारीदरम्यान केएल राहुल याने 75 धावांची शानदार खेळी केली.

हे सुद्धा वाचा

दुसरा एकदिवसीय सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा 19 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

दुसऱ्या सामन्याचं आयोजन कुठे?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणम येथील डॉक्टर वाय एस राजशेखर रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.

लाईव्ह मॅच कुठे पाहता येणार?

हा दुसरा वनडे सामन्याचं टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्क होणार आहे. विविध भाषेत हा सामना पाहता येणार आहे. तसेच डिज्नी हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि जयदेव उनादकट.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स केरी, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिश, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि एडम झॅम्पा.