मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी टी-20 सामना सूर आहे. टॉस जिंकत प्रथम फलंदाजीसाठी भारताला ऑस्ट्रेलिया संघाने आमंत्रित केलंय. भारताने 20 ओव्हरमध्ये 235-4 धावा केल्या आहेत. कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान असणार आहे. यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन या तिघांनी अर्धशतके केलीत. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये रिंकू सिंह याने आक्रमक फटकेबाजी करत संघाला 200 चा टप्पा पार करून दिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
भारताकडून सलामीला ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल आले होते. यामधील यशस्वीने कांगारूंच्या गोलंदाजांचा चांगला घाम काढला. पठ्ठ्याने एकाही गोलंदाजांला सोडलं नाही. अवघ्या 25 बॉलमध्ये 53 धावा केल्या. 220 च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने आपल्या खेळीमध्ये 9 चौकार 2 षटकार
मारत टी-20 दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक होताच मोठा फटका मारण्याच्या नादात तो आऊट झाला. त्यानंतर आलेल्या इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला.
दोघांमध्ये इशान किशनने सुरूवातीला एकेरी दुहेरी धाव घेतली. एकदा सेट झाल्यावर त्यानेही दांडपट्टा सुरू केल. 32 बॉलमध्ये 52 धावा केल्या, या खेळीमध्ये त्याने 4 सिक्स आणि 3 चौकार मारले. इशान आऊट झाल्यावर सूर्यकुमारने आपल्या स्टाईलने पहिल्याच बॉलवर सिक्स मारला. पण 19 धावांवर तो आऊट झाला. सूर्या गेल्यावक आलेल्या रिंकू सिंहने परत एकदा आपला जलवा दाखवला.
रिंकू सिंह याने अवघ्या 9 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या, 344 च्या स्ट्राईक रेटने खेळताना रिंकू सिंह याने दोन सिक्सर आणि चार चौकार मारले. शेवटला रिंकूच्या फलंदाजीने भारताने 235 पर्यंत मजल मारली.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (w), सूर्यकुमार यादव (C), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (w/c), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, तन्वीर संघा