मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी-20 सामना आज पडणार आहे. (IND vs AUS 2nd T-20) तिरूवनंतपुरमध्ये संध्याकाळी सात वाजता ग्रीनफील्ड (Greenfield International Stadium) या स्टेडियममध्ये होणार आहे. पहिल्या सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. रिंकू सिंहने सिक्स मारला खरा पण नो-बॉलनेच टीम इंडियाने हा सामना जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. मात्र आजच्या सामन्यावर पावसाचं संकट आहे.
केरळची राजधानी असलेल्या तिरूवनंतपुरममध्ये पाऊस पडत आहे. शनिवारी झालेल्या पावसाने स्टेडियमममध्ये पाणी साचलेलं. त्यामुळे आजच्या सामन्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजचा सामना संध्याकाळी असून त्यावेळी मैदान कोरडं होईल. रात्री जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.
संध्याकाळी तिरुवनंरपुरममधील तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस इतकं राहिल. हवेतील आद्रता 75 टक्केर राहणार आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना खराब हवेमुळे डोळ्यांना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
आजच्या सामन्यामध्ये संघात बदल होण्याची शक्यता आहे. सुर्यरकुमार यादवने पहिल्या सामन्यात संघाचं नेतृत्त्व चांगल्या प्रकारे केलं आहे. मागील सामन्यात गोलंदाजांना चांगलाच मार पडला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजांमध्ये काही बदल केले जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सूर्यकुमार यादव (C), रुतुराज गायकवाड (VC), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (Wk), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार