मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना काही वेळात सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारताने सीरिजमधील पहिला सामना जिंकला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कांगारूंनी बदल केलेले पाहायला मिळाले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झम्पा या दोघांना संघात घेतलं आहे.
टीम इंडियामध्ये आज कोणताही बदल केलेला पाहायला मिळाला नाही. सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यातील संघच दुसऱ्या टी-20 मध्ये कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाने आजच्या सामन्यात बेहरेनडॉर्फ आणि आरोन हार्डी यांना संघात स्थान मिळालेलं नाही. मॅथ्यू वेड याने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरलेला ऋतुराज आजच्या सामन्यात किती धावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या ऋतुराजची बॅट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळपताना दिसली नाही. वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या झम्पाचं भारतीय फलंदाजांना आव्हान असणार आहे.
दरम्यान, टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघासमोर युवा खेळाडूंचं आव्हान असणार आहे. सूर्याच्या नेतृत्त्वाखाली आजच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करताना किती धावा करतात हे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण ग्लेन मॅक्सवेलसारखा घातक खेळाडू कांगारूंच्या संघात परतला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (w), सूर्यकुमार यादव (C), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (w/c), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, तन्वीर संघा