केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला आले होते. पण पहिल्याच चेंडूवर यशस्वीची विकेट गेल्याने दडपण वाढलं. त्यामुळे केएल राहुलही सावध खेळी करू लागला. केएल राहुलने 18 चेंडूचा सामना केला पण एकही धाव घेता आली नाही. तर तिसऱ्या स्थानावर उतरलेल्या शुबमन गिलने 24 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. त्यामुळे केएल राहुलवर किती दडपण होतं याचा अंदाज येतो. 19 व्या चेंडूचा सामना करताना केएल राहुल विकेट देऊन बसला. बोलँडच्या पहिल्याच चेडूवर शॉट खेळतान चुकला आणि विकेटकीपरने कोणतीही चूक न करता झेल पकडला. त्यामुळे निराश होत केएल राहुल तंबूकडे परतत होता. पण पंचांनी नो बॉलचा इशारा केला आणि जीव भांड्यात पडला. केएल राहुलला खेळण्याची एक संधी मिळाली. या संधीचं सोन करावं हीच क्रीडाप्रेमींची इच्छा होती. नो बॉल असल्याने पहिला चेंडू परत टाकावा लागला आणि निर्धाव गेला.
दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलला दोन धावा करण्यात यश आलं. त्यामुळे शून्यावर बाद होण्याची भीती संपली. तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा केएल राहुलचं नशिब चमकलं. कारण बॅटचा किनारा लागत चेंडू उस्मान ख्वाजाजवळ गेला. पण झेल त्याच्या हातून सुटला आणि केएल राहुलला दुसऱ्यांदा जीवदान मिळालं. अशा पद्धतीने केएल राहुलला एकाच षटकात दोन जीवदान मिळाले. या संधीचा त्याने काही अंशी फायदा उचलला. केएल राहुलने 4 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला.
‘KL’ucky Rahul! 😮💨#ScottBoland’s dramatic start to the #PinkBallTest: No-ball dismissal of #KLRahul on the first delivery and a dropped catch on the fifth ball! 🏏🎭
Will he make it BIG now? 👀#AUSvINDOnStar 2nd Test 👉 LIVE NOW on Star Sports! #AUSvIND | #ToughestRivalry pic.twitter.com/dCYLDKv2Pd
— Star Sports (@StarSportsIndia) December 6, 2024
केएल राहुल आणि शुबमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. दरम्यान, पहिल्या दिवशी भारताचा खेळ 180 धावांवर आटोपला. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 1 गडी गमवून 86 धावा केल्या. भारताकडे अजूनही 94 धावांची आघाडी आहे. तसेच दुसऱ्या दिवशी 9 गडी झटपट बाद करण्याचं आव्हान आहे.