मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा 17 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (आधीचं फिरोजशाह कोटला स्टेडियम) करण्यात आलं आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात कांगारुंना पराभूत केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला चितपट करण्याचा प्रयत्न असणार आहे.
दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी श्रेयसचं संघात कमबॅक झालंय. त्यामुळे टीम मॅनेजमेंट श्रेयसला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार का, याकडे लक्ष असणार आहे. जर श्रेयसला संधी मिळाली, तर सूर्यकुमाकर यादव याला बाहेर बसावं लागेल.सूर्याने नागपूरमध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र सूर्याला त्याच्या लौकीकाला साजेळी अशी कामगिरी आपल्या डेब्यूत करता आली नाही.
केएल राहुल पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. केएलला चमकदार कामगिरी करता आली नाही. केएलने 71 बॉलमध्ये 20 धावांची खेळी केली. तर डेब्यूटंट केएस भरत यानेही 8 धावाच केल्या. त्यामुळे दु्सऱ्या कसोटीत या दोघांवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असणार आहे. कारण, टीममध्ये शुबमन गिल आणि इशान किशन हे संधीची वाट पाहत आहेत.
शुबमन गिल सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. त्याला पहिल्या कसोटीत संधी न दिल्याने नेटकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. राहुल दुसऱ्या कसोटीत गडबडला, तर तिसऱ्या कसोटीत त्याचा पत्ता कट होण्याची अधिक शक्यता आहे.
टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएस भरत, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.