INDvsAUS | सूर्यकुमार यादव दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही? कोच द्रविड काय म्हणाला?

| Updated on: Feb 16, 2023 | 1:44 AM

टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. द्रविड काय म्हणाला जाणून घेऊयात.

INDvsAUS | सूर्यकुमार यादव दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही? कोच द्रविड काय म्हणाला?
Follow us on

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या दरम्यान टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी प्लेइंग इलेव्हनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच श्रेयस अय्यर याच्या फिटनेसबाबत माहिती दिली आहे.

द्रविडचा इशारा

श्रेयस अय्यर जर 5 दिवसांच्या सामन्यात वर्कलोड झेलण्यास तयार असेल, तर मागील कामगिरीच्या जोरावर टीममध्ये कमबॅक करेल. अय्यर याला श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत पाठीच्या खालील भागात दुखापत झाली होती. अय्यर आपल्या दुखापतीवर एनसीएत मेहनत घेत आहे. अय्यर याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं होतं.

सूर्यकुमारचा पत्ता कट?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या नागपूर कसोटीत सूर्यकुमारला श्रेयसच्या जागी संधी देण्यात आली होती. जर श्रेयसचं कमबॅक झालं तर सूर्यकुमारला बाहेर व्हावं लागेल. द्रविडने अय्यरच्या फिटनेसबाबत सविस्तर माहिती सांगितली नाही. मात्र जो दुखापतग्रस्त खेळाडू लवकर दुखापतीतून कमबॅक करेल, त्याचं संघांतील स्थान निश्चित होईल, असं द्रविडने सांगितलं.

द्रविड काय म्हणाला?

“कोणत्याही खेळाडूचं दुखापतीतून सावरुन परत येणं हे चांगलं असतं. दुखापतीमुळे कोणत्याही खेळाडूला आम्ही गमावू शकत नाही, हे कोणत्याच टीमसाठी चांगलं नाही. याबाबत आम्ही सराव सत्रानंतर निर्णय घेऊ. अय्यरने आज सराव केला आहे. आम्ही पुन्हा त्याच्या सरावाचं परीक्षण करु, तसंच त्याला कसं जाणवतंय याची माहिती घेऊ. जर तो तयार असेल, तर त्याला टीममध्ये स्थान देऊ”, असं द्रविडने नमूद केलं.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुहमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.