मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 269 धावा केल्या आहेत. कांगारूंकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. भारताला मालिका खिशात घालायची असेल 270 धावा करतर सामना जिंकावा लागणार आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कांगारूंनी सावध सुरूवात केली. सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी 68 धावांची भागीदारी केली. भारताला पहिली विकेट 11 व्या षटकामध्ये मिळाली. हार्दिकने टीम इंडियाला झटपट 1 नाही 2 नाही तर 3 विकेट्स मिळवून दिल्या. इतकच नाही, तर हार्दिकने स्टीव्हन स्मिथ याचा शून्यावर काटा काढून दुसऱ्या वनडेतील बदलाही घेतला.
हार्दिकनंतर कुलदीप यादवने कांगारूंच्या मधल्या फळाला एकट्याने सुरूंग लावला. डेव्हिड वॉर्नर23 धावा , मार्नस लॅबुशेन 28 आणि अॅलेक्स कॅरी 38 धावा यांना बाद कुलदीपने बाद केलं. यामधील कॅरीला त्याने बोल्ड केलं तो चेंडू मॅजिक बॉलसारखाच स्पिन झालेला पाहायला मिळाला. ऑफ साईडला पडलेल्या चेंडूने लेग स्टम्प उडवला. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनीही 2 गडी बाद करत ऑल आऊट करण्यात मोलाची भूमिका बजावली. भारताला तिसरा सामना जिंकायचा असेल तर प्रमुख फलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.