इंदूर | पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाला इंदूरमधील तिसरी कसोटी जिंकण्याची नामी संधी आहे. ऑस्ट्रेलियाला इंदूर टेस्ट जिंकण्यासाठी फक्त 76 धावांची गरज आहे. टीम इंडियाचा दुसरा डाव हा दुसऱ्या दिवसअखेर 163 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या डावात 88 धावांची आघाडी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे आव्हान मिळाले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याने आता ऑस्ट्रेलियाला हे विजयी आव्हान पूर्ण करण्यासाठी तिसऱ्या दिवशी मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाची पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही घसरगुंडी झाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 60.3 ओव्हरमध्ये 163 धावांवरच रोखलं.
टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजारा एकटा ऑस्ट्रेलियाला भिडला. पुजाराने टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 26, अक्षर पटेल 15*, आर अश्विन 16, विराट कोहली 13 आणि रोहित शर्मा 12 धावा केल्या. उमेश यादव आणि मोहम्मद सिराज हो दोघे भोपळाही फोडू शकले नाहीत. तर 3 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात एकट्या नॅथन लायन याने 8 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू मॅथ्यू कुह्नमैन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडियाला पहिल्या डावात 109 धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 197 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 88 धावांची आघाडी मिळाली. तर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 88 धावांवर फक्त अधिकच्या 75 धावाच केल्या. त्यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचेच आव्हान देता आले.
त्याआधी ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 60 धावा केल्या. त्यानंतर मार्नस लाबुशेन 31, स्टीव्ह स्मिथ 26, कॅमरुन ग्रीन 21 आणि हॅन्डस्कॉम्बने 19 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने 4, आणि आर अश्विन उमेश यादव यो दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र रोहितचा तो निर्णय चुकीचा ठरला. टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 109 धावाच करता आल्या.
पहिल्या डावात टीम इंडियाकडून विराट कोहली 22, शुबमन गिल 21, श्रीकर भरत आणि उमेश या दोघांनी 17, अक्षर पटेल आणि रोहित शर्मा या दोघांनी प्रत्येकी 12 अशा धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुह्नमैन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. नॅथन लायन याने 3 तर आणि मर्फीने 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.