IND Vs AUS, 3rd Test, Live Streaming | तिसरा सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार?

| Updated on: Feb 28, 2023 | 8:27 PM

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत उतरणार आहे. तर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद भूषवणार आहे.

IND Vs AUS, 3rd Test, Live Streaming | तिसरा सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार?
Follow us on

इंदूर | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा 1 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भिडणार आहेत. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी आणि मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. या तिसऱ्या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

तिसरा सामना केव्हा होणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना हा 1-5 मार्चदरम्यान होणार आहे.

कुठे होणार सामना?

हा तिसरा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सामना किती वाजता सुरु होणार?

उभयसंघातील तिसऱ्या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 9 वाजता टॉस होणार आहे.

सामना कुठे पाहता येणार?

तिसरा कसोटी सामना हा डिज्नी+हॉटस्टार वर पाहता येईल. तसेच टीव्ही9 मराठीवर या वेबसाईटवर मॅचसंबंधित बातम्या वाचता येतील.

ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे

दरम्यान तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स खेळणार नाही. कौटुंबिक कारणामुळे पॅट मायदेशी परतला आहे. त्यामुळे पॅटच्या जागी स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

स्टीव्हचा कसोटी कर्णधारपदाचा अनुभव

स्टीव्हने एकूण 36 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी केलीय. यातील 20 सामन्यात पॅटने ऑस्ट्रेलियाला विजयी केलं आहे. स्टीव्हकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे. त्यामुळे आता स्टीव्ह ऑस्ट्रेलियाला या मालिकेत पहिला विजय मिळवून देणार का, याकडे ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 1-5 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव स्मिथ (कॅप्टन), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मॅथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.