इंदूर | पहिल्या 2 सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्धच्या इंदूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कमबॅक केलंय. कांगारुंनी तिसऱ्या सामन्यातील पहिला दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिल्या डावात गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियाने केलेल्या धावा पूर्ण करत आघाडी घेतली. पहिल्या दिवसअखेर 47 धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावून 156 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दुसऱ्या दिवशी कांगारुंना झटपट आऊट करण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेने, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमॅन.