राजकोट | टीम इंडिया विरुद्ध यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 27 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने इंदूरमधील दुसरा सामना 99 धावांनी जिंकून मालिका खिशात घातली. आता टीम इंडियाचा तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला क्लिन स्वीप देण्याचा मानस असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.
या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात अनेक बदल होणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांचं कमबॅक होणार आहे. या चौघांना पहिल्या 2 वनडे सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे केएल राहुल याला कॅप्टन्सी आणि रवींद्र जडेजा याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होतं. आता तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा कर्णधारपद सांभाळणार आहे.
तिसऱ्या सामन्यातून टीम इंडियात एक घातक गोलंदाज कमबॅक करणार आहे. या गोलंदाजाने दुसऱ्या वनडेतून ब्रेक देण्यात आला होता. जसप्रीत बुमराह तिसऱ्या सामन्यात खेळणार आहे. बुमराह दुसऱ्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे खेळला नव्हता. मात्र तो तिसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचं बीसीसीआयने तेव्हाच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बुमराह तिसऱ्या वनडेत खेळणार असल्यांच निश्चित आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या तिसऱ्या सामन्यातून ऑलराउंडर अक्षर पटेल हा बाहेर पडला आहे. अक्षरला आशिया कप स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच अक्षरला तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे.
तिसऱ्या वनडेसाठी इंडियन क्रिकेट टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.