मुंबई | ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक ठरणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकून आघाडी घेतली. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजयासह बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा याआधी 2019 मध्ये 5 सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाचा तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालत पराभवाचा वचपा घेण्याचा निर्धार असणार आहे. मात्र या तिसऱ्या सामन्यातून सूर्युकमार यादव याचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता आहे.
सूर्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरतोय, असं आम्ही नाही तर आकडेवारी सांगतेय. सूर्याला गेल्या 10 डावा अर्धशतकही करता आलेलं नाही. सूर्याची 10 डावातील 34 नाबाद ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्याने गेल्या 10 डावांमध्ये 9,8,4,34*,6,4,31,14, 0, 0 अशा धावा केल्या आहेत.
तिसऱ्या वनडे मॅचआधी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सूर्यकुमार यादव याच्याबाबत विधान केलं आहे. तसेच श्रेयस अय्यर दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याने खेद व्यक्त केला. मात्र द्रविडने सूर्यकुमारच्या फ्लॉप कामगिरीनंतरही सहानभूती दाखवली. सूर्या पहिल्य दोन्ही सामन्यात सपशेल अपयशी ठरला. सूर्या दोन्ही सामन्यात खातंही उघडू शकला नाही.
श्रेयसला दुखापत होणं हे फार दुर्भाग्यपूर्ण आहे. श्रेयस हा चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्यांपैकी एक आहे. त्याच्या जागी खेळणाऱ्या सूर्यकुमार याच्या कामगिरीबाबत मी फार चिंतेत आहे. सूर्या दोन चांगल्या बॉलवर आऊट झाला. सूर्याला टी 20 प्रमाणे वनडे क्रिकेटचा अनुभव नाही”, असं द्रविड यांनी स्पष्ट केलं. दरम्यान द्रविडच्या या विधानामुळे सूर्या तिसऱ्या सामन्यतही खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.