चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 ओव्हरमध्ये शानदार सुरुवात केली. या खेळीमुळे टीम इंडिया बॅकफुटवर गेली होती. ऑस्ट्रेलियाची ज्या प्रकारे सुरुवात झाली त्यानुसार कांगारु किमान 350 पार मजल मारणार असं चित्र होतं. मात्र हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या जोडीने टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. हार्दिकने ऑस्ट्रेलियाला पहिले 3 झटपट धक्के दिले. त्यानंतर कुलदीपने आपल्या फिरकीने कांगारुंना नाचवलं. मात्र या सामन्यातील पहिल्या डावात कुलदीपच्या एका बॉलची जोरदार चर्चा रंगली आहे. कुलदीपने टाकलेला हा बॉल पाहून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न याचा बॉल ऑफ द सेंच्युरी आठवला.
कुलदीपने एलेक्स कॅरीला क्लिन बोल्ड करत तिसरी विकेट घेतली. कुलदीपसाठी ही तिसरी विकेट कायम लक्षात राहिल. कुलदीपने घेतलेल्या या विकेटची नोंद ही सुवर्ण अक्षरात झाली आहे. कुलदीपने डावखुऱ्या एलेक्सला लेग साईडला टाकलेला बॉल ऑफ साईडला वळला आणि कॅरीच्या डोळ्यासमोरच स्टंपला जाऊन लागला, म्हणजेच कॅरी क्लिन बोल्ड झाला. स्वत: कॅरीला काही क्षण आपण आऊट झालोय यावर विश्वास बसला नाही.
कुलदीप यादव याचा मॅजिकल बॉल
Bamboozled ?
An epic delivery from @imkuldeep18 to get Alex Carey out!
Australia 7⃣ down now.
Follow the match ▶️ https://t.co/eNLPoZpSfQ #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/DCNabrEGON
— BCCI (@BCCI) March 22, 2023
कुलदीपने टाकलेला हा मॅजिकल बॉल नक्कीच बॉल ऑफ द सीरिज ठरलाय, यात काहीही शंका नाही. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच कुलदीपने या सामन्यात 10 ओव्हरमध्य 56 धावा देत एकूण 3 विकेट्स घेतल्या. तर 1 मेडन ओव्हर टाकली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.