मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पाचवा टी-20 सामना बंगळुरूमध्ये पार पडणार आहे. पहिल्या चार सामन्यांमध्ये टीम इंडियाने 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. आजचा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार असून साडे सहा वाजता टॉस होणार आहे. शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजय मिळवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल. तर कॅप्टन सूर्यकुमार आजच्या सामन्यात संघात बदल करण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यासाठी Dream 11 मध्ये खाली दिलेला संघ तुम्हाला तुमची टीम लावण्यासाठी मदकत करू शकतो.
ड्रीम 11 टीम
यष्टिरक्षक : मॅथ्यू वेड, जितेश शर्मा.
फलंदाज: ट्रॅव्हिस हेड, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग (C), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल
अष्टपैलू: मॅथ्य, अक्षर पटेल (VC)
गोलंदाज: नॅथन एलिस, रवी बिश्नोई.
रिंकू सिंह याला कॅप्टन करून एक प्रयोग करून पाहा आणि अक्षर पटेल याला उपकर्णधार करा. अक्षर बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगनेही तुम्हाला पॉईंट्स देऊ शकतो. त्यामुळे या दोन खेळाडूंना तुम्ही कर्णधार आणि उपकर्णधार करू शकता.
Hello from Bengaluru 👋
We’re all set for the 5th and the Final #INDvAUS T20I 👌👌
⏰ 7 PM IST
💻 https://t.co/Z3MPyeL1t7#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kNapYakWJ2— BCCI (@BCCI) December 3, 2023
सुरू असलेल्या मालिकेमध्ये सर्वाधिक करण्याच्या यादीमध्ये ऋतुराज गायकवाड याच्यानंतर सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने 4 सामन्यांमध्ये 139 धावा केल्या असून चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सूर्याला संधी मिळाली तर तोडफोड फलंदाजी पाहायला मिळू शकते.
सूर्यकुमार यादव (C), रुतुराज गायकवाड (VC), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार