नवी दिल्ली : हैदराबादमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 3rd T20I) तीन सामन्यांच्या शेवटच्या आणि अखेरच्या टी-20मध्ये टीम इंडियानं (Team India) विजय मिळवलाय. यात सूर्यकुमार यादवची आतषबाजी आणि विराट कोहलीची (Virat Kohli) थेट खेळीनं महत्त्वाची भूमिका बजावली. भारतानं तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करून मालिका 2-1 अशी जिंकली.
?. ?. ?. ?. ?. ?. ?. ?. ? ?#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/5yk3bRnHiV
— BCCI (@BCCI) September 25, 2022
अक्षरला प्लेयर ऑफ द सीरिजचा पुरस्कार देण्यात आला. अक्षरनं तीन सामन्यांच्या मालिकेत 8 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याची सरासरी 7.33 होती. तिसऱ्या सामन्यात अक्षरने 4 षटकात 33 धावा देत तीन बळी घेतले.ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने एका सामन्यात तीन विकेट घेत दुसरे स्थान पटकावले.
3⃣ Matches
8⃣ WicketsFor his superb bowling performance, @akshar2026 wins the Player of the Series award. ? ?#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/aykOxDuIwc
— BCCI (@BCCI) September 25, 2022
अक्षर म्हणाला की, जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता आणि संघ जिंकतो तेव्हा खूप छान वाटते. मला वाटते की मी जी रेषेची लांबी टाकली आहे ती मी परत करतो. एखाद्या फलंदाजाने मोठा फटका मारला तरी मी तसाच प्रयत्न असतो.
?️?️ I am enjoying my process at the moment: @imVkohli
Scorecard ▶️ https://t.co/xVrzo737YV #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/7JlLTyDj6y
— BCCI (@BCCI) September 25, 2022
विराट कोहलीनं आक्रमक फटके करत धावांचा वेग वाढवला. सूर्यकुमार यादवनंही आक्रमणाची जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला मैदानाच्या प्रत्येक भागात चौकार आणि षटकार मारुन दम भरला.
For his breathtaking batting display in the chase, @surya_14kumar bags the Player of the Match award. ? ?
Scorecard ▶️ https://t.co/xVrzo737YV #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/YrvpUyDTxt
— BCCI (@BCCI) September 25, 2022
सूर्यकुमारनं तीन सामन्यांच्या मालिकेत 115 धावा केल्या. सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, ‘मला तशी फलंदाजी करावी लागली. मला नेहमीच माझ्या पद्धतीनं फलंदाजी करायची होती. पहिल्या चेंडूवर मला चौकार लागला की बाद झाला याने मला काही फरक पडत नाही.