नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानातून एक मोठी बातमी हाती येतेय. हैदराबादमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 3rd T20I) तीन सामन्यांच्या शेवटच्या आणि अखेरच्या टी-20मध्ये टीम इंडियानं (Team India) टॉस जिंकला (toss win) आहे. या सामन्यावर संकटाचे ढग आहे. वातावरण कधीही दगा देऊ शकतं. पण, सध्यातरी सामना सुरू झालाय. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात असल्यानं जगभराच्या नजरा याकडे लागल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
3RD T20I. India won the toss and elected to field. https://t.co/g9kw53R9ay #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 25, 2022
? Toss Update ?#TeamIndia have elected to bowl against Australia in the third #INDvAUS T20I.
Follow the match ▶️ https://t.co/xVrzo737YV pic.twitter.com/QkinggmHiU
— BCCI (@BCCI) September 25, 2022
टीम इंडियानं आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या.
3RD T20I. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, S Yadav, H Pandya, D Karthik (wk), A Patel, H Patel, B Kumar, Y Chahal, J Bumrah. https://t.co/g9kw53R9ay #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 25, 2022
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.
3RD T20I. Australia XI: A Finch (c), C Green, S Smith, J Inglis, G Maxwell, T David, M Wade (wk), D Sams, P Cummins, A Zampa, J Hazlewood. https://t.co/g9kw53R9ay #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 25, 2022
ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (क), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
टीम इंडियानं एक बदल केला असून ऋषभ पंतला बाहेर ठेवण्यात आलंय. तर गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघात परतलाय.
सामन्यापूर्वी दुखापतीमुळे टीम इंडियाला हुडाला बाहेर ठेवावं लागलंय. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार हुडाच्या पाठीत समस्या आहे.