IND vs AUS, 3rd Test : आकाश दीप आणि बुमराहाने शेवटी लाज राखली, सामना ड्रॉ होणार की गमवणार? स्थिती जाणून घ्या

| Updated on: Dec 17, 2024 | 1:31 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय आल्याने खंड पडला. चौथ्या दिवशी भारताने 9 गडी गमवून 252 धावा केल्या. भारताने केएल राहुल आणि रवींद्र जडेजाच्या खेळीच्या जोरावर कशी बशी 200 पार धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर तळाशी आलेल्या जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपने फॉलोऑन वाचवला.

IND vs AUS, 3rd Test : आकाश दीप आणि बुमराहाने शेवटी लाज राखली, सामना ड्रॉ होणार की गमवणार? स्थिती जाणून घ्या
Follow us on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याचा निकाल खरं तर ड्रॉच्या पारड्यात झुकलेला आहे. खरं तर भारताचे दिग्गज फलंदाज फेल गेले. पण केएल राहुल आणि मधल्या फळीत आलेल्या रवींद्र जडेजाने चांगली खेळी केली. केएल राहुलने 84 धावांची खेळी, तर रवींद्र जडेजाने 77 धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारताने 200 पार धावा केल्या. पावसामुळे या सामन्यात वारंवार खंड पडला नाही तर हा सामना ऑस्ट्रेलियाने कधीच जिंकला असता अशी भावना क्रीडाप्रेमींची आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्व गडी बाद 445 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा यांनी केलेली बॅटिंग पाहून क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे. चौथ्या दिवशी तग धरून खेळण्याची गरज असताना रोहित शर्माचा नकोसा फॉर्म कायम राहिला. त्याच्या बॅटला एकप्रकारे ग्रहण लागल्याचं दिसलं. त्यामुळे भारताची फलंदाजीची बाजू कमकुवत असल्याचं दिसत आहे. खराब प्रकाशमानामुळे चौथ्या दिवशीचा खेळ थांबवण्यात आला. भारताने चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 9 गडी गमवून 252 धावा केल्या आहेत. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 193 धावांची आघाडी आहे. आकाशदीप नाबाद 27, तर जसप्रीत बुमराह नाबाद 10 धावांवर खेळत आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना फटका बसणार आहे. कारण दोन्ही संघांच्या विजयी टक्केवारीवर परिणाम होणार आहे. भारताची विजयी टक्केवारी 55.88 टक्क्यांपर्यंत घसरेल, त्यामुळे अंतिम फेरीच्या शक्यतांवर परिणाम होईल. वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर राहील. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 58.88% राहील आणि दुसऱ्या स्थानावर राहील. दक्षिण आफ्रिका 63.33 विजयी टक्केवारीनुसार अव्वल स्थानावर कायम राहील.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.