इंदूर | बातमी आहे क्रिकेट विश्वातून. बुधवारी 1 मार्चपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर टॉस 9 वाजता होणार आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. जाणून घेऊया सविस्तर.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत एकतर्फी फरकाने विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तसेच हा सामना जिंकल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचेल.
यासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात दुसऱ्यांदा पोहचणारी पहिलीच टीम ठरेल. टीम इंडिया याआधी 2021 मध्ये फायनलमध्ये पोहचली होती. तेव्हा न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियासाठी हा तिसरा सामना मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या हिशोबाने फार महत्वाचा आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने या मालिकेतील 2 तर त्याआधी 2 अशा 4 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. त्यानुसार रोहितने कर्णधार म्हणून पहिल्या 4 सामन्यात सलग विजय मिळवलाय. इंदूरमध्ये टीम इंडियाचा विजय झाल्यास रोहितचा कॅप्टन म्हणून सलग 5 वा विजय ठरेल. यासह रोहित कॅप्टन म्हणून सलग कसोटी सामने जिंकण्याचा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करेल.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव स्मिथ (कॅप्टन), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मॅथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.