इंदूर | इंदूर कसोटी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं तिकीट कन्फर्म करु पाहणाऱ्या टीम इंडियाला मोठा झटका बसला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची प्रतिक्षा आणखी वाढली. तर ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन याच्या फिरकीसमोर टीम इंडियाचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. मात्र त्याला अपवाद ठरला तो चेतेश्वर पुजारा.या तिसऱ्या कसोटीत पुजारा एकटाच कांगारुंना भिडला. त्याला चांगली साथ न मिळाल्याने टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवानंतर पुजाराने ट्विट केलंय.
पुजाराने पराभवानंतर टीम इंडियाचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केलाय. “अवघड आहे मात्र आम्ही आणखी जोरात कमबॅक करु”, अशी गर्जना पुजाराने ट्विटद्वारे केलीय. पुजाराने या ट्विटमध्ये 2 फोटो शेअर केले आहेत. पुजाराचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुजाराने या तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या डावात बॅटिंग करताना झुंजार अर्धशतकी खेळी केली.पुजाराच्या या खेळीमुळे टीम इंडियावर दुसऱ्याच दिवशी पराभवाचं असलेलं संकट टळलं. पुजाराने 142 बॉलमध्ये 59 धावांची खेळी केली. या खेळीत पुजाराने 5 चौकार आणि 1 अप्रतिम सिक्स खेचला.
चेतेश्वर पुजारा याचं ट्विट
Tough one, but we'll come back stronger! ? pic.twitter.com/fBjvmobjyE
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) March 3, 2023
दरम्यान टीम इंडियाचा तिसरा कसोटी सामन्यात पराभव झाल्याने आता चौथा सामन्यात विजय मिळवणं महत्वाचं असणार आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकला तर थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचेल. तसेच मालिका 3-1 च्या फरकाने जिंकेल. मात्र या सामन्यात पराभव झाला, तर टीम इंडियाचं फायनलचं समीकरण हे जर तर वर अवलंबून असेल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.