IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताची काय स्थिती? जाणून घ्या

| Updated on: Dec 16, 2024 | 1:31 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना गाबा स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्याचा तिसरा दिवसाचा खेळ वेळेआधीच संपला. भारताने 17 षटकांचा सामना करत 4 गडी गमवून 51 धावा केल्या आहेत.

IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताची काय स्थिती? जाणून घ्या
Follow us on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून 1-1 ने बरोबरी आहे. भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अंगलट आला असंच म्हणावं लागेल. कारण ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व बाद 445 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांनी दमदार शतकं ठोकली. तसेच एलेक्स कॅरेने 70 धावांची खेळी करत भारताला बॅकफूटवर ढकललं. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हाच भारताचा पराभव नजरेस पडू लागला आहे. यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला अवघ्या 4 धावा करता आल्या. पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट देऊन आला. शुबमन गिलही आला आणि 1 धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीही काही खास करू शकला नाही. 3 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतही काही खास करू शकला नाही. 9 धावांवर असताना पॅट कमिन्सचा बळी ठरला.

पाऊस आणि त्याने खराब प्रकाशमान यांचा अंदाज घेऊन तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी भारताने 51 धावांवर 4 महत्त्वाचे गडी गमावले आहेत. भारतीय संघ अजूनही 394 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताचा फैसला चौथ्या दिवशीच होईल असं दिसत आहे. भारताकडून केएल राहुल नाबाद 33 आणि रोहित शर्मा नाबाद 0 धावांवर खेळत आहे. आता भारताची लाज पावसाच्या हाती आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आणि खेळ झाला नाही तर हा सामना ड्रॉकडे झुकेल. भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आशा पल्लवित राहतील.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप