Video : बुमराहच्या नो बॉलमुळे टीम इंडिया पुन्हा गमावणार सामना? शेवटच्या षटकात असं काही झालं..

| Updated on: Dec 29, 2024 | 2:43 PM

मेलबर्न कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात हातातून निसटून गेला आहे असंच म्हणावं लागेल. शेवटची झटपट बाद करण्यात अपयश आलं. शेवटी खेळत असलेल्या स्कॉट बोलँड आणि नाथन लियॉन जोडीने 55 धावांची नाबाद भागीदारी केली.

Video : बुमराहच्या नो बॉलमुळे टीम इंडिया पुन्हा गमावणार सामना? शेवटच्या षटकात असं काही झालं..
Follow us on

मेलबर्न कसोटीत चौथ्या सत्रात जसप्रीत बुमराहच्या नो बॉलची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. कारण 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत असंच काहीसं पाहायला मिळालं होतं. कारण जसप्रीत बुमराहने शेवटची विकेट घेतली खरी पण नो बॉलमुळे सर्व काही पाण्यात गेलं. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये 1928 मध्ये 332 धावांचा सर्वात मोठा स्कोअर गाठण्यात यश आलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान इंग्लंडविरुद्ध गाठलं होतं. आता भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने 333 धावा केल्या आहे. अजूनही ऑस्ट्रेलियाच्या हाती एक विकेट आहे. त्यामुळे मेलबर्न कसोटी भारताला मोठी धावसंख्या गाठवी लागणार यात काही शंका नाही. कदाचित चौथ्या दिवशीच्या शेवटच्या षटकातच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपला असता.

बुमराहच्या गोलंदाजीवर स्लिपला उभ्या असलेल्या केएल राहुलने अप्रतिम झेल पकडला. टीम इंडियाने जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. पण नो बॉलमुळे त्यावर विरजन पडलं. कारण पंचांनी नो बॉल घोषित केला. केएल राहुलने दोन पायांच्या मधोमध हा झेल पकडला होता.बुमराह आणि नो बॉल ही स्थिती यापूर्वी घडली आहे. त्याचा फटका टीम इंडियाला बसला होता.

2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम फेरीत नो बॉल टाकला होता. तेव्हा भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. बुमराहाच्या नो बॉलमुळे फखर जमा चौथ्या षटकात बाद होता होता वाचला होता. त्यानंतर त्याने शतक ठोकलं आणि पाकिस्तानने 358 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला नही.

मेलबर्नमध्ये मागच्या 70 वर्षात 250 हून अधिक धावा गाठल्या गेल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया आतापर्यंतचं सर्वात मोठं टार्गेट देणार आहे. भारताने चौथ्या डावात 400 प्लस धावा केल्या आहेत. मागच्या दौऱ्यात भारताने गाबामध्ये 329 धावा गाठल्या होत्या. मात्र पाचव्या दिवशी 333 हून अधिक धावा गाठणं शक्य आहे की नाही यबाबत शंका आहे.