बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील महत्त्वाचा सामना भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावाचा खेळ 474 धावांवर आटोपला. त्यामुळे इतकी मोठी धावसंख्या गाठताना फॉलोऑनचं संकट ओढावू नये अशीच क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे. असं असताना यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या भागीदारीने काही अंशी टीम इंडिया आणि चाहत्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. असं सर्व सामन्याचं चित्र असताना दुसऱ्या दिवशी एक विचित्र प्रकार मैदानात घडला. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती म्हणा की फॅन मैदानात घुसला आणि फिल्डिंग करणाऱ्या विराट कोहलीच्या खांद्यावर हात ठेवला. असं सांगितलं जात आहे की सदर व्यक्ती 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत मैदानात घुसली होती. इतकंच काय तर खांद्यावर हात ठेवून मिठी मारण्याचा प्रयत्नात असताना सुरक्षारक्षक पोहोचले आणि त्याने त्याला पकडून मैदानाबाहेर नेले.
मैदानात घुसलेल्या सदर व्यक्तीने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. तसेच हातात युक्रेचा झेंडा असल्याचं दिसत आहे. त्याच्या टीशर्टवर फ्री असं लिहिलं होतं. सदर व्यक्ती मैदानात उतरल्यानंतर फ्री युक्रेनचं समर्थन करताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सदर घटना विराट कोहली आणि अन्य खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक असल्याचं मानलं जात आहे.
PITCH INVADER AT THE MCG. pic.twitter.com/3rCcxO3E8D
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 27, 2024
2023 WC final 🤝 2024 MCG Test.
– I think the same person has met Kohli twice inside 1 year. pic.twitter.com/ixhVXm5f3u
— Johns. (@CricCrazyJohns) December 27, 2024
2023 वर्ल्डकप भारतात झाला होता. तेव्हाही विराट कोहलीसोबत असंच काहीसं झालं होतं. तेव्हा एका सामन्यात एक व्यक्ती तशीच वेशभूषा करून विराटकडे आला होता. तेव्हा त्याने फिलिस्तीन मास्क लावलं होतं. हा विराटचा विदेशी फॅन असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी 275 धावांची गरज आहे. त्यात चौथ्या दिवशी दिग्गज खेळाडू 150 धावांवर तंबूत परतले आहेत.