मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा टी20 सामना रायपूरला होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. भारताला मालिका विजयासाठी, तर ऑस्ट्रेलियाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा विजय गरजेचा आहे. अन्यथा मालिकेचा निर्णय पाचव्या सामन्यापर्यंत ढकलला जाईल. तिसऱ्या सामन्यात मॅक्सवेलच्या वादळी खेळीने टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न एक सामना दूर गेलं. आता चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा मानस असेल. चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यर टीम इंडियात खेळेल. जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस हे खेळाडू चौथ्या सामन्यात खेळणार नाहीत.
रायपूरच्या शहीद नारायण सिंह आंतरराष्ट्रीय मैदानात पहिलाच टी20 सामना होणार आहे. या मैदानावर छत्तीसगड पुरुष टी20 इन्विटेशन कप 2023 स्पर्धेचे 17 सामने खेळले गेलेत. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ शेवटच्या पाच सामन्यात जिंकला आहे. तर 150 च्या आसपास धावा झाल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे या मैदानात मोठा धावसंख्या होणं कठीण आहे.
टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अर्शदीप सिंग, दीपक चहर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान
ऑस्ट्रेलिया : टीम हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, मॅट शॉर्ट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन
ड्रीम इलेव्हन 1 : इशान किशन (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, मॅथ्यू शॉर्ट, जेसन बेहरेनडॉर्फ, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
ड्रीम इलेव्हन 2 : इशान किशन, जोश फिलिप (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टीम हेड, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल (कर्णधार), बेन मॅकडरमॉट, अक्षर पटेल, मॅट शॉर्ट, एरॉन हार्डी