रायपूर | टीम इंडियाने चौथ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय मिळवलाय. भारताने विजयासाठी दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 154 धावाच करता आल्या. टीम इंडियाचा हा या सीरिजमधील एकूण तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने यासह 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाचा हा भारतातील सलग पाचवा टी 20 मालिका विजय ठरला.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून बांधून ठेवलं होतं. टीम इंडियाला सुरुवातीला विकेट्स मिळाल्या नाहीत. मात्र त्यानंतर टीम इंडियाने कांगारुंना झटपट धक्के दिले. टीम इंडियाकडून अक्षर पटेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीपक चाहरने दोघांना आऊट केलं. तर आवेश खान आणि रवी बिश्नोई या जोडीने 1-1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन मॅथ्यु वेड याने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. मॅथ्युने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ते शक्य झालं नाही. मात्र मॅथ्युने या सामन्यात एक खास कामगिरी केलीय.
मॅथ्यु वेड याने महेंद्रसिंह धोनी आणि जॉस बटलर यांच्या पगंतीत स्थान मिळवलंय. मॅथ्युने टी 20 क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून कॅचचं अर्धशतक पूर्ण केलंय. मॅथ्यु अशी कामगिरी करणारा पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे. मॅथ्युने कॅप्टन सूर्यकुमार यादव याची कॅच घेत हा अनोखा कारनामा केला.
Most catches as Keeper in T20Is :-
76 – Quinton de Kock
59 – Jos Buttler
57 – MS Dhoni
51- Ifran Karim
50 – Matthew Wade pic.twitter.com/4u29CuaXI1— Sports News Cricket (@sports_new92609) December 1, 2023
दरम्यान टी 20 क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक याच्या नावावर आहे. डी कॉक याने टी 20 मध्ये सर्वाधिक 76 कॅचची नोंद आहे. तर इंग्लंडच्या जॉस बटलर याने 59 कॅच घेतल्या आहेत. महेंद्रसिंह धोनी 57 कॅचसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर इरफान करीम 51 कॅचसह चौथ्या स्थानी आहे. तर आता मॅथ्यु वेडने 50 कॅचसह पाचवं स्थान काबीज केलंय.
चौथ्या टी 20 मॅचसाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार.
चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.