रायपूर | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. ऑस्ट्रेलिया कॅप्टन मॅथ्यू वेड याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया दोन्ही संघानी प्लेईंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत.
चौथ्या सामन्यासाठी टीम इंडियात 4 बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रसिध कृष्णा याच्या जागी मुकेश कुमार याची एन्ट्री झाली आहे. मुकेश कुमार याने तिसऱ्या सामन्यातून विवाहासाठी विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता प्रसिध कृष्णा याच्या जागी मुकेशची एन्ट्री झाली आहे. अर्शदीप सिंह याच्या जागी दीपक चाहर याचा समावेश करण्यात आला आहे. तिलक वर्मा याच्या जागी श्रेयस अय्यर याचा समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर या आणि पाचव्या सामन्यात उपकर्णधार असणार आहे. तर ईशान किशन याच्या जागी जितेश शर्मा याला संधी दिली आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 5 बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाने मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, झाये रिचर्डसन आणि नॅथन एलिस यांना बाहेर ठेवलं आहे.
दरम्यान आतापर्यंत उभयसंघात एकूण 29 टी 20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा दबदबा राहिला आहे. टीम इंडियाने 29 पैकी 17 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाला 11 सामन्यात यश आलं आहे. तर एकमेव सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.
ऑस्ट्रेलिया टॉसचा बॉस
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss and elect to bowl in Raipur.
Follow the Match ▶️ https://t.co/iGmZmBsSDt#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GD0PhQIepF
— BCCI (@BCCI) December 1, 2023
चौथ्या टी 20 मॅचसाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार.
चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.