रायपूर | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला चौथ्या टी 20 सामन्यात विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 8 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. टीम इंडियाकडून रिंकू सिंह याने सर्वाधिक 46 धावा केल्या. ओपनर यशस्वी जयस्वाल 37 धावा करुन आऊट झाला. जितेश शर्मा याने झंझावाती 35 रन्स केल्या. ऋतुराज गायकवाड याने 32 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी मात्र निराशा केली. श्रेयस अय्यर 8 आणि सूर्यकुमार 1 रन करुन माघारी परतले. दीपक चाहर आणि अक्षर पटेल या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर रवी बिश्नोई याने 4 धावा केल्या. आवेश खान 1 धावेवर नाबाद परतला.
ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइस याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. बेनने सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा आणि अक्षर पटेल या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर आरोन हार्डी याने 1 विकेट घेतली.
दरम्यान टीम इंडियासाठी या सामन्यात सर्वात मोठी भागीदारी ही पाचव्या विकेटसाठी झाली. रिंकू सिंह आणि जितेश शर्मा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची निर्णायक भागीदारी केली. रिंकूने 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 46 धावा केल्या. तर जितेशने 19 बॉलमध्ये 1 चौकार आणि 3 खणखणीत सिक्सच्या मदतीने 35 धावा जोडल्या.
रिंकूकडून कांगारुंची धुलाई
Innings break!
Rinku Singh top-scores with 46 as #TeamIndia set a 🎯 of 175 👌
Second innings coming up shortly ⏳
Scorecard ▶️ https://t.co/iGmZmBsSDt#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4q17vMLbBi
— BCCI (@BCCI) December 1, 2023
चौथ्या टी 20 मॅचसाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार.
चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.