IND vs AUS, 4th Test | टीम इंडिया 444 धावांनी पिछाडीवर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला

| Updated on: Mar 10, 2023 | 5:35 PM

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा चौथा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.

IND vs AUS, 4th Test | टीम इंडिया 444 धावांनी पिछाडीवर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Follow us on

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसरा दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडिया 444 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 36 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघेही नाबाद मैदानात आहेत. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 480 धावांवर आटोपला. या निमित्ताने दुसऱ्या दिवशी काय काय झालं हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी एकूण 225 धावा केल्या तर पहिल्या दिवसअखेर 4 बाद 255 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंग्समध्ये एकूण 480 रन्स केल्या.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या दिवसाचा खेळ खल्लास

208 धावांची द्विशतकी भागीदारी

कॅमरुन ग्रीन आणि उस्मान ख्वाजा या जोडीने पाचव्या विकेट्साठी 208 धावांची द्विशतकी भागीदारी केली. या दरम्यान ग्रीने शतक ठोकलं. मात्र काही धावा जोडल्यानंतर ग्रीन आऊट झाला.कॅमरन ग्रीन याने 114 धावांची खेळी केली. ही सेट जोडी आर अश्विन याने फोडली. त्यानंतर अश्विनने त्याच ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर एलेक्स कॅरीला आऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना झटपट गुंडाळलं. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजने सर्वाधिक 180 धावांची खेळी केली.

अश्विचा ‘सिक्स’

टीम इंडियाकडून फिरकीपटू आर अश्विन याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने ट्रेव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, कॅमरून ग्रीन, अलेक्स कॅरे, मिशेल स्टार्क, नाथन लायन आणि टोड मर्फीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज

दरम्यान आता ऑस्ट्रेलियाने दिलेल्या डोंगऱ्याएवढ्या धावांना प्रत्युतर देण्यासाठी टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज असणार आहे. रोहित आणि शुबमन या दोघांनी खेळ संपेपर्यंत आश्वासक 36 धावांची नाबाद भागीदारी केलीय. आता तिसऱ्या दिवशी ही जोडी किती मोठी भागीदारी रचणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

चौथ्या कसोटीबाबत थोडक्यात

ऑस्ट्रेलिया 480-10 पहिला डाव
टीम इंडिया 36-0, 10 Over, पहिला डाव

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.