अहमदाबाद | चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 ओव्हरमध्ये बिनबाद 3 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू मॅथ्यू कुन्हेमन नाबाद परतले. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 91 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात अजूनही 88 धावांनी पिछाडीवर आहे. आता सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी काय चम्तकार होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने पहिल्या डावात कांगारुंनी डोंगराएवढ्या केलेल्या 480 धांवाचा टप्पा पूर्ण करुन 91 धावांची चांगली आघाडी घेतली. टीम इंडियाचा पहिला डाव 571 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून विराट कोहली याने 186 धावांची झुंजार खेळी केली. विराटने या खेळीत 364 बॉलमध्ये 15 चोकार ठोकले. विराटनंतर शुबमन गिल याने सर्वाधिक 128 रन्सची शतकी खेळी केली.
चौथ्या दिवसाचा खेळ खल्लास
Australia unscathed after India take lead.#WTC23 | #INDvAUS | ? https://t.co/VJoLfVSMyd pic.twitter.com/tECXazgG0H
— ICC (@ICC) March 12, 2023
अक्षर पटेल याने 79 धावांची तुफानी खेळी साकारली. श्रीकर भरत याने विराट कोहली याला चांगली साथ देत 44 धावांचं योगदान दिलं. चेतेश्वर पुजारा 42 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कॅप्टन रोहित शर्मा याला 35 धावाच करता आल्या. रविंद्र जडेजाला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. जडेजा 28 रन्सवर आऊट झाला. अश्विन मोठा फटका मारण्याच्या नादात 7 धावांवर खेळत असताना कॅचआऊट झाला. मोहम्मद शमी आणि उमेश यादव या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर श्रेयस अय्यर याला दुखापतीमुळे खेळायला मैदानात येता आलं नाही.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी या जोडीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुन्हेमन या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 180 रन्स केल्या. त्यानंतर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची शतकी खेळी केली. उस्मान आणि ग्रीन या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फी याने नाबाद 41 धावा केल्या.
कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावा करुन माघारी परतला. नॅथन लायन याने 34 रन्सचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड याने 32 रन्स केल्या. पीटर हँड्सकॉम्ब याने 17, मिचेल स्टार्क 6 आणि मार्नस लाबुशेन याने 3 धावा केल्या. एलेक्स कॅरी याला अश्विनने भोपळाही फोडु दिला नाही. तर कुहनेमॅन शून्यावर नाबाद परतला. टीम इंडियाडून अश्विनशिवाय मोहम्मद शमी याने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.