IND vs AUS : डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हिस हेडचा काटा बुमराहने अखेर काढला, Watch Video

| Updated on: Dec 26, 2024 | 12:01 PM

भारताने चौथ्या कसोटी सामन्यातील शेवटच्या सत्रात चांगलं कमबॅक केलं. तरुण सॅम कोनस्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी चांगली सुरुवात केली होती. पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली होती. पण नंतर बुमराहचा मारा प्रभावी ठरला.

IND vs AUS : डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हिस हेडचा काटा बुमराहने अखेर काढला, Watch Video
Follow us on

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुरुवातील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे हे दोन्ही कर्णधारांना माहिती होतं. पण रोहित शर्मा नाणेफेक हरला आणि वाटेला गोलंदाजी आली. सॅम कोनस्टास आणि उस्माने ख्वाजा यांनी साजेशी सुरुवात करून दिली. कोनस्टासने तर जसप्रीत बुमराहला दोन षटकार मारत हेतूही स्पष्ट केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी मोठी धावसंख्या उभारण्यास ऑस्ट्रेलियाला यश आलं. त्यामुळे टीम इंडिया कमबॅक करेल की नाही याबाबत शंका होती. पहिली विकेट जडेजाने घेतली. त्यानंतर उस्मान ख्वाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यात बुमराहला यश आलं. तग धरून असलेल्या मार्नस लाबुशेनची विकेट वॉशिंग्टन सुंदरने काढली. त्यानंतर फलंदासीठी आलेला ट्रेव्हिस हेड काय करेल याचा अंदाज क्रीडाप्रेमी लावून बसले होते. कारण मागच्या दोन सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं होतं.

ट्रेव्हिस हेड सहा चेंडू खेळून 0 या धावसंख्येवर होता. समोर जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. सातवा चेंडू खेळताना ट्रेव्हिस हेडचा अंदाज चुकला. बुमराहने अचूक टप्प्याचा टाकलेला चेंडू वेल लेफ्ट करण्याचा नादात चूक करून बसला. हा चेंडू स्टम्पवरील बेल्स घेऊन गेला. त्यामुळे डोकेदुखी ठरू शकतो असा ट्रेव्हिस हेड खातंही खोलू शकला नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वकाही सांगून गेला.

पहिल्या दिवसावर खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली आहे. कारण 300 च्या पार धावा करण्यात हमखास यश हे दिसत आहे. त्यामुळे पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे. या सामन्यात शुबमन गिलला डावलून वॉशिंग्टन सुंदरला जागा देण्यात आली आहे. दुसरीकडे, रोहित शर्माला ओपनिंगला फलंदाजी करणार आहे. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा मारा परतवून लावणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.