IND vs AUS 4th Test : टीम इंडियाचा चौथ्या कसोटी सामन्यात पराभव, ड्रॉ होणारा सामना गमावला

| Updated on: Dec 30, 2024 | 12:09 PM

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना भारताने गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 340 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही टीम इंडियाला गाठणं शक्य नव्हतं. त्यामुळे ड्रॉ करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण भारताच्या काही चुकांमुळे हा सामना गमवण्याची वेळ आली.

IND vs AUS 4th Test : टीम इंडियाचा चौथ्या कसोटी सामन्यात पराभव, ड्रॉ होणारा सामना गमावला
Follow us on

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या निष्क्रिय फलंदाजीचा फटका टीम इंडियाला बसला. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाच्या वाटेला गोलंदाजी आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने पहिल्या डावात चांगली झुंज दिली. शतकी खेळी करत भारतावरील फॉलोऑनचं संकट टाळलं. तसेच भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. भारताने पहिल्या डावात 369 धावांची खेळी केली. तरी ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने या धावांच्या पुढे खेळताना 234 धावांची खेळी केली. शेपटाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. तसेच भारतासमोर पाचव्या दिवशी 340 धावांचं मोठं आव्हान ठेवलं. खरं तर हे आव्हान काही गाठणं सोपं नव्हतं. त्यामुळे ड्रॉ करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली.  टीम इंडिया 155 धावांवर ऑलआऊट झाली आणि ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजय मिळवला.

कर्णधार रोहित शर्मा 9, केएल राहुल 0, विराट कोहली 5, रवींद्र जडेजा 2, नितीश कुमार रेड्डी 1 धाव करून बाद झाले. दुसरीकडे यशस्वी जयस्वालने 84 धावांची झुंजार खेळी केली. सामना वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. खरं तर ऋषभ पंतच्या एका चुकीच्या फटक्यामुळे भारताची लय तुटली. ऑस्ट्रेलियाला सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळाली. त्यानंतर यशस्वी जयस्वालला वादग्रस्त पद्धतीने रिव्हयूत बाद झाला. त्यामुळे भारताची लय पूर्णपणे बिघडून गेली. शेपटाचे फलंदाज 20 षटकं खेळून काढतील अशी स्थिती नव्हती. त्यामुळे भारत हा सामना गमवणार हे स्पष्ट झालं होतं. रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याच्या धावांपेक्षा जसप्रीत बुमराहच्या विकेट जास्त आहेत. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्याच्यापेक्षा चांगलं खेळतात असं दिसून आलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलियाचा संघ : उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरे (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलँड

टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप