IND vs AUS, 4th Test: ऑस्ट्रेलियाने जिंकला नाणेफेकीचा कौल, भारताच्या वाटेला गोलंदाजी आल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला…

| Updated on: Dec 26, 2024 | 5:26 AM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना होत आहे. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि कर्णधार पॅट कमिन्स याने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या वाटेला गोलंदाजी आल्यानंतर रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

IND vs AUS, 4th Test: ऑस्ट्रेलियाने जिंकला नाणेफेकीचा कौल, भारताच्या वाटेला गोलंदाजी आल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला...
Follow us on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना दोन्ही संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीवर या सामन्याचा निकालाचा परिणाम होणार आहे. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. क्षणाचाही विलंब न करता पॅट कमिन्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्णयानंतर पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आज आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करणार आहोत. या खेळपट्टीवर थोडेसे गवत आहे, ते छान आणि टणक दिसते. ही आतापर्यंतची एक उत्तम मालिका आहे. ऑस्ट्रेलियात जेव्हा तुम्हाला ख्रिसमसनंतर चांगली झोप लागते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पहिल्या चेंडूची वाट पाहत असता. सॅम फलंदाजीची सलामी देईल आणि स्कॉटही हेझलवूडसाठी मैदानात उतरेल.’

भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘आम्हीही फलंदाजी केली असती, चांगली विकेट दिसते. मालिका 1-1 अशी आहे त्यामुळे आम्हाला एक संघ म्हणून आम्ही काय आहोत हे दाखवण्याची उत्तम संधी देते. तुमच्या समोर कोणतीही परिस्थिती असली तरी तुम्हाला लढावेच लागेल. हा एक नवीन दिवस आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आमच्या संघात एक बदल आहे. गिल ऐवजी वॉशिंग्टन संघात आला.’ यानंतर रोहित शर्माला फलंदाजीला वर येणार का? याबाबत विचारले. त्यावर रोहित शर्मा म्हणाला की, होय, मी फलंदाजीला वर येईन. दरम्यान, मेलबर्नमध्ये गेल्या 13 वर्षात ऑस्ट्रेलियन संघाला फक्त दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले आणि दोन्ही वेळेस भारताने पराभूत केले आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.