नितीश कुमार रेड्डीचा अर्धशतकी खेळीनंतर अनोखा स्वॅग! पुष्पा स्टाईलने केलं सेलिब्रेशन Watch Video

| Updated on: Dec 28, 2024 | 9:23 AM

बॉक्सिंग डे कसोटीत नितीश कुमार रेड्डीने खिंड लढवली. एकीकडे भारतावर फॉलोऑनचं संकट असताना नितीश कुमार रेड्डीने झुंज दिली. छोटे टार्गेट पूर्ण करत भारतावरचं फॉलोऑनचं संकट तर टाळलं. तसेच कांगारुंना अडचणीत धावसंख्येत भरही घातली.

नितीश कुमार रेड्डीचा अर्धशतकी खेळीनंतर अनोखा स्वॅग! पुष्पा स्टाईलने केलं सेलिब्रेशन Watch Video
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी चौथा कसोटी सामना भारतासासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात खऱ्या अर्थाने करो या मरोची स्थिती होती. भारताला हासामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. जर तसं झालं नाही तर किमान अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी सामना ड्रॉ करणं आवश्यक आहे. असं असताना यशस्वी जयस्वाल वगळता आघाडीचे सर्व फलंदाज फेल गेले. कर्णधार रोहित शर्मा असो की विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर नांगी टाकली. अशा स्थितीत भारतावर फॉलोऑनचं संकट होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आशा सोडून दिल्या होत्या. अशा स्थितीत नितीश कुमार रेड्डी वादळाचा सामना करण्यासाठी उभा राहिला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सक्षमपणे सामना केला. छोटे छोटे टार्गेट पूर्ण करत फॉलोऑनच्या वेशीपर्यंत भारताला घेऊन आला.

नितीश कुमार रेड्डीने 82 चेंडूत 51 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 1 षटकार मारला. या अर्धशतकानंतर त्याने अनोख्या पद्धतीने सेलीब्रेशन केलं. पुष्पा चित्रपटातील झुकेगा नहीं साला या स्टाईलने बॅट हेल्मेट खालून फिरवली. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. बीसीसीआयने देखील फ्लावर नहीं फायर है असं लिहित ट्वीट केलं आहे.इतकंच काय तर नितीश कुमार रेड्डीने शतकाच्या दिशेने कूच केली आहे.

नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांची भागीदारी टीम इंडियासाठी तारक ठरली आहे. 474 धावांचा पाठलाग करताना 300 धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे प्रत्येक धावांसोबत कांगारुंचं टेन्शन वाढत चाललं आहे. कारण इतक्या मोठ्या धावांचा डोंगर रचूनही तळाशी आलेल्या फलंदाजांना बाद करणं काही जमलं नाही. रोहित शर्मा आणि आघाडीच्या फलंदाजासाठी रणनिती आखली खरी.. पण नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीचा कठीण पेपर आला. हा पेपर सोडवता सोडवता बरंच काही हातून सुटून गेलं. आठव्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागीदारी केली.