अहमबादाबाद | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला. यासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली. टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सलग चौथा मालिका विजय ठरला. टीम इंडियाने 2013 पासून ते आतापर्यंत एकूण 4 मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियानेचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. तसेच टीम इंडियाचा हा भारतातील सलग 16 वा मालिका विजय ठरलाय. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही धडकही मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया 7 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात भिडणार आहे.
मालिका विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारल्याने टीम इंडियाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा अनुभवी आणि स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन हा निवृत्त होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. स्वत: अश्विनने तसं ट्विट केलं. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अश्विनने टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याचा फोटो ट्विट केला आहे. या फोटो पुजारा बॉलिंग करतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना अनिर्णित राहणार असल्याचं समजताच कॅप्टन रोहित शर्मा याने शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना बॉलिंग टाकायला दिली. पुजारा याने 1 ओव्हर टाकली. पुजाराचा बॉलिंग करतानाचा फोटो अश्विनने ट्विट करत “मै क्या करु जॉब छोड दू”, असं विनोदी कॅप्शन दिलंय. दरम्यान पुजाराची कसोटी क्रिकेटमध्ये बॉलिंग टाकण्याची ही दुसरीच वेळ होती.
अश्विनचं विनोदी ट्विट
Main kya karu? Job chod du? ? pic.twitter.com/R0mJqnALJ6
— Ashwin ?? (@ashwinravi99) March 13, 2023
दरम्यान या संपूर्ण मालिकेत टीम इंडियाच्या रविंद्र जडेजा आणि आर अश्विन या अनुभवी फिरकी जोडीने ऑलराउंड कामगिरी केली. अश्विनने या सीरिजमध्ये 25 विकेट्स घेतल्या. तर जडेजा याने 22 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे या दोघांची ‘मॅन ऑफ द सीरिज’ म्हणून निवड करण्यात आली. या पुरस्कारचं 2 लाख 50 हजार रुपये असं स्वरुप होतं.
अश्विन बॉर्डर गावसकर ट्रॉफीती एकाच सीरिजमध्ये 25 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. या आधी अश्विनने 2013 मध्येही अशीच 25 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.