IND vs AUS : तेवढं मन मोठं लागतं! शुबमन गिल याच्या शतकानंतर कोहलीच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

| Updated on: Mar 11, 2023 | 8:19 PM

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये सर्वांची मनं जिंकली आहेत.

IND vs AUS : तेवढं मन मोठं लागतं! शुबमन गिल याच्या शतकानंतर कोहलीच्या त्या कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
Follow us on

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये सर्वांची मनं जिंकली आहेत. विराटने अर्धशतक करत आपण परत एकदा फॉर्ममध्ये आल्याचं दाखवून दिलं. मात्र बॅटींगला येण्याआधीच विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. नेमकं काय झालं होत ज्यामुळे सर्वजण विराट कोहलीचं इतकं कौतुक करत आहेत.

नेमकं काय झालं होतंं?

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावामध्ये 480 धावांचा डोंगर उभारला आहे. दुसऱ्या दिवशी नाबाद राहिलेल्या सलमीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी तिसऱ्या दिवसाला सुरूवात केली. रोहित 35 वर बाद झाला मात्र गिलने आपलं आक्रमण चालूच ठेवलं होतं. गिल आणि पुजाराने 113 धावांची भागीदारी केली. पाहता-पाहता गिलने आपलं शतकही पूर्ण केलं. एक चौकार मारत गिल याने आपल्या शतकाला गवसणी घातली त्यावेळी पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या विराट कोहलीनेही उठून आनंद टाळ्या वाजवत व्यक्त केला.

 

विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूने युवा खेळाडूच्या शतकावर अशा प्रकार उभं राहून व्यक्त केलेला आनंद सर्वांना आवडला. युवा खेळाडूसाठीही मोठी गोष्ट आहे कारण कोहली भारतीय क्रिकेट संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहेच. त्यासोबतच तो एक दिग्गज खेळाडूही आहे. क्रीडा विश्वातील चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला असून कोहली उगाचं मोठा खेळाडू नाही तेवढं मनही मोठं लागतं, असं नेटकरी म्हणत आहेत.

दरम्यान, विराटला गेल्या काही सामन्यांपासून सूर गवसत नव्हता. मात्र या सामन्यात जुना विराट क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाला. शुबमन आणि विराट या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी झटपट अर्धशतकी भागीदारी केली. शतक ठोकल्यानंतर शुबमन आणखी आक्रमक झाला होता. शुबमन ऑस्ट्रेलियासाठई डोकेदुखी ठरत होता. मात्र नॅथन लायन याने शुबमन याचा काटा काढला. शुबमन 235 बॉलमध्ये 12 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 128 रन्स केल्या. तिसऱ्या विकेटसाठी विराट आणि शुबमनने 58 धावा जोडल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारत अजुनही 191 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने 3 विकेट्स गमावत 289 धावा केल्या आहेत.