बंगळुरु | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम भारत दौऱ्यातील टी 20 सीरिजमधील पाचवा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. तर टीम इंडियानेही या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया ही मालिका 4-1 ने जिंकण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ही मालिका एकतर्फी होऊ न देण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन मॅथ्यु वेड याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी पाचव्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये दीपक चाहर याच्या जागी अर्शदीप सिंग याला संधी देण्यात आली आहे. दीपक चाहर याच्या घरी मेडीकल एमर्जन्सी असल्याने तो परतला आहे. त्यामुळे अर्शदीपला संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाने बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस ग्रीन याच्या जागी नॅथन एलिस याला संधी दिली आहे.
“पहिले बॉलिंग करायला आवडलं असतं. मी टीममधील सहकाऱ्यांना कोणताही बदल न करता त्यांच्या पद्धतीने खेळाला सांगितलं आहे. तसेच जाऊ खेळाचा आनंद घ्या असंही म्हटलंय.”, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉसनंतर दिली. आता टीम इंडियाचे फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर 20 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
🚨 Toss Update from Bengaluru 🚨
Australia elect to bowl in the 5th & Final T20I.
Follow the Match ▶️ https://t.co/CZtLulpqqM#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zdFW3hJZDX
— BCCI (@BCCI) December 3, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.