IND vs AUS 5th T20I | ऋतुराजची चिन्नास्वामीत ऐतिहासिक कामगिरी, विराटचा रेकॉर्ड थोडक्यात बचावला

| Updated on: Dec 03, 2023 | 11:22 PM

Ruturaj Gaikwad IND vs AUS 5th T20I | पुणेकर आणि टीम इंडियाचा युवा ओपनर बॅट्समन ऋतुराज गायकवाड याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध संपूर्ण मालिकेत तडाखेदार बॅटिंग केली. ऋतुराजने यासह ऐतिहासिक कामिगरी केली आहे. नक्की काय केलंय जाणून घ्या.

IND vs AUS 5th T20I | ऋतुराजची चिन्नास्वामीत ऐतिहासिक कामगिरी, विराटचा रेकॉर्ड थोडक्यात बचावला
Follow us on

बंगळुरु | भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया टीमवर पाचव्या टी 20 सामन्यात 6 धावांनी विजय मिळवत मालिका 4-1 जिंकली. ऑस्ट्रेलियाला 161 धावांचा पाठलाग करताना 8 विकेट्स गमावून 154 धावाच करता आल्या. अर्शदीप सिंह याने 20 व्या ओव्हरमध्ये 10 धावांचा यशस्वी बचाव केला. तर त्याआधी टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. श्रेयस व्यतिरिक्त इतर फलंदाजांनी योगदान दिलं. मात्र काही फलंदाज अपयशी ठरले. पुणेकर ऋतुराज गायकवाड मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ऋतुराज 10 धावा करुन आऊट झाला. मात्र त्याने या खेळीसह मोठा विक्रम केला आहे.

ऋतुराज ऑस्ट्रेलिया विरुद्ध द्विपक्षीय टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय ठरला. ऋतुराजने या 5 सामन्याच्या मालिकेत धमाकेदार बॅटिंग केली. ऋतुराजने या सीरिजमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 200 पेक्षा अधिक धावा केल्या. ऋतुराजचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं शतक हे त्याच्या कारकीर्दीतील पहिलं शतक ठरलं. ऋतुराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध या मालिकेत एकूण 223 धावा केल्या.

विराट कोहली याचा रेकॉर्ड बचावला

ऋतुराज ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ऋतुराजला आणखी धावा करुन विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी होती. मात्र ऋतुराजची ही संधी 9 धावांनी हुकली. विराटच्या नावावर द्विपक्षीय टी 20 मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. विराटने एका द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक 231 धावा केल्या आहेत.

ऋतु’राज’ गायकवाड

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.