IND vs AUS 5TH T20I | अर्शदीप सिंहची गेमचेंजिग ओव्हर, टीम इंडियाचा 6 धावांनी विजय

| Updated on: Dec 03, 2023 | 10:47 PM

INDIA vs AUSTRALIA 5TH T20I | अर्शदीप सिंह याने शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरवत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाच्या इतर गोलंदाजांनीही 161 धावांच्या बचावात निर्णायक भूमिका बजावली.

IND vs AUS 5TH T20I | अर्शदीप सिंहची गेमचेंजिग ओव्हर, टीम इंडियाचा  6 धावांनी विजय
Follow us on

बंगळुरु | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर रंगतदार झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाला मात्र 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 154 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाला 20 व्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मॅथ्यु वेड मैदानात उभा होता. मात्र अर्शदीपने हुशारीने बॉलिंग केली. अर्शदीपने धोकादायक मॅथ्यु वेड याला आऊट केलं आणि सामना फिरवला. तसेच अर्शदीपने शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांचा शानदार बचाव करत फक्त 3 रन्सच दिल्या.

ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉट याने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. ट्रेव्हिस हेड याने 28 धावांचं योगदान दिलं. टीम डेव्हिड याने 17 आणि मॅथ्यु शॉर्ट याने 16 धावा जोडल्या. आरोन हार्डी याने 6 तर जोश फिलीपी 4 धावा करुन माघारी परतला. बेन ड्वार्शुइस आला तसाच झिरोवर परत करत गेला. कॅप्टन मॅथ्यू वेड याने 22 धावा केल्या. तर नॅथन एलिस याने 4 आणि जेसन बेहरेनड्रोफ याने 2 धावा केल्या. टीम इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. टीम इंडियाडकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अनुक्रमे 21 आणि 10 धावा केल्या. श्रेयस अय्यर याने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 53 रन्स केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव 5 आणि रिंकू सिंह 6 रन्स करुन तंबूत परतले. विकेटकीपर जितेश शर्मा याने 24 आणि अक्षर पटेल याने 31 धावा केल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 2-2 धावा जोडल्या.

टीम इंडिया विजयी

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.