बंगळुरु | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पाचव्या टी 20 सामन्यात विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. टीम इंडिया टॉस गमावून बॅटिंगसाठी आली. टीम इंडियाच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर सलामी जोडी माघारी गेली.त्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले. जितेश शर्मा आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही फार मोठी भागीदारी करण्यात यश आलं नाही. मात्र श्रेयसने केलेल्या अर्धशतकामुळे टीम इंडियाला 160 पर्यंत मजल मारली.
यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या ओपनिंग जोडीने 33 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर दोघेही झटपट आऊट झाले. यशस्वी मोठा फटका मारण्याच्या नादात 21 धावांवर कॅच आऊट झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड हा देखील 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव 5 धावा करुन माघारी परतला. रिंकू सिंहकूडन अनेक अपेक्षा होत्या. मात्र तो अपयशी ठरला. रिंकूने 6 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे टीम इंडियाची 4 बाद 55 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर जितेश आणि श्रेयस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जितेश 24 धावा करुन आऊट झाला.
जितेशनंतर श्रेयसला अक्षर पटेल याने चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 46 धावा जोडल्या. अक्षरने 31 धावांचं बहुमुल्य योगदान दिलं. त्यानंतर श्रेयसने अर्धशतक ठोकलं. मात्र श्रेयस अर्धशतकानंतर 3 धावा करुन आऊट झाला. श्रेयसने 37 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 53 धावंची खेळी केली. त्यानंतर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी 2 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनड्रॉफ आणि बेन ड्वार्शुइस या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. तर एरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघा या तिघांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
श्रेयस अय्यर याचं अर्धशतक
Innings Break!
A 🔝 fifty from Shreyas Iyer powers #TeamIndia to 160/8 in the first innings 👌👌
Australia chase coming up shortly ⏳
Scorecard ▶️ https://t.co/CZtLulpqqM#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jw83vXyBXo
— BCCI (@BCCI) December 3, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.