मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आता टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेला येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी काही आठवड्यांपूर्वीच संघ जाहीर केला आहे. तर बीसीसीआयने 20 नोव्हेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाची धुरा देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या दोघांकडून आलटून पालटून उपकर्णधारपद दिलं गेलंय. या मालिकेला अवघे काही तास बाकी असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टी 20 सीरिजमधून स्टार ओपनरने माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने माघार घेतली आहे. डेव्हिड वॉर्नर याने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नरने माघार घेतल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. वॉर्नरने 13 व्या वनडे वर्ल्ड कपमध्ये 500 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपनंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यात पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. या मालिकेसाठी वॉर्नरने माघार घेतली आहे. या मालिकेची तयारी करण्यासाठी वॉर्नरने हा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
डेव्हीड वॉर्नर याची माघार
JUST IN: David Warner has withdrawn from the five-match T20 series against India beginning on Thursday after Australia’s “successful yet demanding World Cup campaign”.#INDvAUS https://t.co/YLsFKZa1PN
— cricket.com.au (@cricketcomau) November 21, 2023
टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी मॅथ्यू वेड याला कर्णधार करण्यात आलं आहे. तर वॉर्नरने माघार घेतल्याने दुसऱ्या खेळाडूला संघात संधी मिळाली आहे. डेव्हिड वॉर्नर याच्या जागी आरोन हार्डी याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन अब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.