ॲडलेडमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना सुरू आहे. दुसऱ्या सामन्यात पहिल्याच दिवशी टीम इंडियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारतीय फलंदाजांना एक- एक धाव करण्यासाठी मोठा संघर्ष करवाला लागला. विशेष म्हणजे ज्या अॅडलेडच्या मैदानावर हा सामना सुरू आहे, त्या मैदानावर पर्थच्या मैदानात चेंडू जसा उसळी घेता होता तसं काहीही दिसून आलं नाही. अॅडलेडचं मैदान हे सपाट आहे. या मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी सर्घष करावा लागेल असं चित्र असताना मात्र प्रत्यक्षात उलटच घडलं, टीम ऑस्ट्रेलियानं भारतीय फलंदाजांना स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या डावात भारताची इनिंग ही सर्वबाद 180 धावांवरच आटोपली. नाणेफेक वगळता आज भारताच्या बाजुनं एक देखील चांगली गोष्ट घडली नाही.
भारतासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून जो चक्रव्यूह बनवण्यात आला होता. त्या चक्रव्यूहामध्ये भारतीय फलंदाज सहज अडकले.काही फलंदाज हे आत येत असलेल्या बॉलला मारण्याच्या नादात आउट झाले तर काही जण येणारा बॉल सोडून द्यायचा की खेळायचा अशा द्विधा मनस्थितीमध्ये असताना आउट झाले.
आपल्या पहिल्या स्पेलच्या पहिल्या बॉलवर स्टार्कनं पहिल्या मॅचमध्ये हिरो राहिलेल्या यशस्वी जैस्वाल याला आऊट केलं. त्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये एकापाठोपाठ एक विकेट घेतल्या. त्याने या डावात टीम इंडियाच्या सहा फलंदाजांना बाद केलं. के एल राहुलला आउट करण्यासाठी त्याने खास प्लॅन बनवला होता.के एल राहुल हा बोलँडच्या गोलंदाजीवर आधी देखील आउट झाला होता, मात्र तो नो बॉल देण्यात आला. त्यानंतर स्टार्कनं त्याच पद्धतीचा मारा कायम ठेवला. त्याने सातत्यानं ऑफ स्टंपवर मारा केला. तर त्याने काही बॉल वेगानं आता वळवले त्यामुळे फलंदाजांच्या मनात शंका निर्माण झाली. बॉल खेळावा की सोडून द्यावं या द्विधा मनस्थितीमध्ये असताना अनेक जण आउट झाले.
विराटसाठी देखील अशाच प्रकारचं जाळं फेकण्यात आलं त्याने आउट होण्यापूर्वी एक खणखणीत चौकार देखील लावला. मात्र त्यानंतर काही बॉल हे आत आल्यामुळे तो देखील द्विधा मनस्थितीमध्ये होता. याच दरम्यान तो आउट झाला. पहिल्या सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र टीम ऑस्ट्रेलियानं जोरदार पुनरागमन केल्याचं दिसून येत आहे.