मुंबई | टीम इंडियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियावर 6 विकेट्सने मात केली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. तर टीम इंडियाची वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा आणखी 4 वर्षांनी वाढली. आता या वनडे वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हार्दिक पंड्या हा या दुखापतीमुळे या टी 20 सीरिजला मुकला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव याला टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पहिल्या 3 सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड हा उपकर्णधार असेल. तर शेवटच्या 2 सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.
पहिला सामना, 23 नोव्हेंबर, विशाखापत्तनम, संध्याकाळी 7 वाजता.
दुसरा सामना, 26 नोव्हेंबर, तिरुअंतपुरम, संध्याकाळी 7 वाजता.
तिसरा सामना, 28 नोव्हेंबर, गुवाहाटी, संध्याकाळी 7 वाजता.
चौथा सामना, 1 डिसेंबर, रायपुर, संध्याकाळी 7 वाजता.
पाचवा सामना 3 डिसेंबर, बंगळुरू, संध्याकाळी 7 वाजता.
टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
🚨 NEWS 🚨#TeamIndia’s squad for @IDFCFIRSTBank T20I series against Australia announced.
Details 🔽 #INDvAUShttps://t.co/2gHMGJvBby
— BCCI (@BCCI) November 20, 2023
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ | मॅथ्यू वेड (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन अब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.